आपल खान्देशक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र
जळगावात ‘डायनासोर’; कुंभारखोरी पार्कमध्ये महाकाय प्रतिकृती!
कोविड अनलॉक नंतर निसर्ग सहवासात जॉगिंग करणाऱ्यासाठी लांडोरखोली पार्क पर्वणी ठरू शकेल. लवकरच तेथे आणखी दोन डायनासोरच्या प्रतिकृती बसविल्या जातील. कारंजेही सुरू केले जातील. यंदा १५०० वृक्ष येथे लावले जाणार आहे.
डॉ.सैफुन शेख, विभागीय वनअधिकारी, जळगाव.
जळगाव ः शहरातील कोल्हे हिल्स जवळ कुंभारखोरी पार्क. येथे १५ हेक्टर जागेत अनेक प्रकारच्या वनस्पती, झाडे, आयुर्वेदीक झाडे लावली आहे. त्यासोबतच तेथे आता २ किलोमिटर अंतराएवढा मॉनिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. ते काम नूकतेच पूर्ण झाले असून ते मॉर्निग वॉक करणाऱ्यासाठी खुला करण्यात आला आहे. या पार्कममध्ये लुप्त झालेल्या महाकाय ‘डायनोसोर’ची प्रतिकृती बसविण्यात आली आहे.





