माजी आमदार दिलीप वाघ यांनी शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला
पाचोरा (झूम मराठी ऑनलाईन) विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष माजी आमदार दिलीप वाघ यांनीशक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात नियोजन मांडले. राजे संभाजी चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती, रेल्वे भुयारी मार्ग, शेतकरी सहकारी संघमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणुक काढण्यात आली.
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी सामूहिक राजीनामा देऊन माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पाठीशी राहणार अशी ग्वाही दिली.
दिलीप वाघ यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज जोरदार शक्तिप्रदर्शन करीत दाखल केला. भडगाव रोड भागातील राजे संभाजी स्मारकाच्या प्रांगणात उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी संजय वाघ, विनय जकातदार, खलील देशमुख, विकास पाटील, शालिग्राम मालकर, अनिल धना पाटील, भूषण पाटील, प्रा. भागवत महालपुरे, अजहर खान, हर्षल पाटील, नितीन तावडे, विजय पाटील, सतीश चौधरी, सुनील पाटील, दगाजी वाघ, प्रकाश भोसले, भूषण वाघ, शिवदास पाटील, ललित वाघ, श्यामकांत भोसले, शशिकांत चंदिले, सुदाम वाघ, भगवान मिस्तरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व वाघ कुटुंबीयांचे हितचिंतक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



