आज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महायुतीच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी उमेदवारी अर्ज भारणार
येत्या २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान प्रत्येक पक्षांचे सांभाव्य उमेदवार तयारी लागले असून
पाचोरा भडगाव विधानसभा महायुतीच्या उमदेवार म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी ह्या आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा उमदेवारी अर्ज दाखल करणार आहेत पाचोऱ्यात आज मोठं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे असून, शिवसैनिक कामाला लागले आहेत. आज 11:00 वाजता गृरुकुल शाळा, वरखेडी रोड येथे शक्ती प्रदर्शन करून प्रचार सभेचे रणशिंग फुकंणार असून पाचोरा भडगाव विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा महिला उमेदवारां कडून दिग्गजानां आव्हाण मिळणार, आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ आणि अमोल शिंदे यांना वैशाली सूर्यवंशी यांचे मोठे आव्हान असणार आहे, यामुळे येणार्या निवडणुकीत कोणाचे पारडे जड ठरते? याचे उत्तर निवडणुकीनंतरच मिळेल.



