महाराष्ट्रराजकीय

भाजपा भटके विमुक्त आघाडी कोकण विभाग ची सामाजिक बैठक टिटवाळा येथे संपन्न..

कल्याण – टिटवाळा (झूम मराठी ऑनलाईन) कल्याण तालुक्यातील टिटवाळा येथे भाजपा भटके विमुक्त आघाडीचे कोकण विभाग अध्यक्ष सतिशजी गिरी यांच्या उपस्थितीत भाजपा कोकण विभाग भटके विमुक्त आघाडीची सामाजिक बैठक मोठया उत्साहात संपन्न.

टिटवाळ्यात भाजपा भटके विमुक्त आघाडी कोकण विभाग अध्यक्ष सतीश गिरी यांच्या मार्गदर्शनात व सरचिटणीस ॲड. योगेश परदेशी हे उपस्थित खाली भटके विमुक्त आघाडी पधादिकाऱ्याची बैठकीत मोठया उत्सहात झाली बैठकीला भटके विमुक्त समाजासाठी शासन कोणकोणत्या योजना राबवत आहे व भटके विमुक्त समाजातील लोकांनी याचा कसा लाभ घ्यावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. भटके विमुक्त समाजाला विकासाच्या प्रवाहात आणले पाहिजे, समाज संघटीत कसा राहील याविषयी संबोधीत करण्यात आले. तसेच सामाजिक बैठकीला उपस्थित सर्व समाज बांधवांचे आभार शैलेश गिरी यांनी मानले.

या बैठकीला उपस्थित  आसाराम गिरी, श्री. किरण गोसावी, शैलेश गिरी, मधुकर गोसावी,  अशोक गिरी, अरविंद गोसावी, हर्षल गोसावी, वेदांत गोसावी. आदि समाज बांधव उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे