आपल खान्देश

एल आय सी ऑफ इंडिया शाखा पाचोरा 65 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पाचोरा येथे एल आय सी ऑफ इंडिया चा 65 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा तालुका प्रतिनिधी शांताराम चौधरी येथील एल आय सी ऑफ इंडिया सॅटॅलाइट ब्रांच तर्फे एल आय सी ऑफ इंडिया चा 65 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला

सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला गत वर्षात कोरोना महामारी च्या काळात मृत्युमुखी झालेल्या ग्राहक विमा प्रतिनिधी विकास अधिकारी कैलास वासी सी के कोतकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर एलआयसीच्या निगम गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पंडितराव शिंदे होते ग्राहक लक्ष्मण आखाडे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आले गेल्या आर्थिक वर्षात सर्वात जास्त प्रीमियम व पॉलिसी असलेले विमा प्रतिनिधी श्री सुजित तिवारी यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला पाचोरा शाखेचे ब्रँच मॅनेजर श्री श्रीराम खैरकर यांनी एलआयसी संदर्भात सखोल माहिती देऊन विमा प्रतिनिधी ना एलआयसी च्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री पंडितराव शिंदे म्हणाले की एलआयसी ही सर्वात श्रेष्ठ दर्जेदार असून ग्राहकांना सुरक्षा हमी व विश्वास देणारे देशातला एकमेव असे महामंडळ आहे एलआयसी चे आधारस्तंभ एजंट असून त्यांना समाजात म्हणावा तसा सन्मान मिळत नाही कारण एजंट या शब्दां येवजी एल आय सी ने त्यांच्यासाठी चांगला गोंडस शब्दप्रयोग जर वापरला एलआयसीच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ होईल विमा विक्री करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा मिळेल त्यांचा उत्साह वाढेल असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले व्यासपीठावर ब्रांच मॅनेजर श्रीराम खैरकर माजी नगराध्यक्ष पंडितराव शिंदे विकास अधिकारी संजय कोतकर भूषण थेपडे देवगिरी ब्रांचे मॅनेजर सुनील बाहेती श्री राणे उपस्थित होते कार्यक्रमासाठी विमा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स प्र अधिकारी हरिश्चंद्र बिरारी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी स प्र अधिकारी अनिल तायडे लक्ष्मण गायकवाड कमलेश मोरे अमोल पाटील यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे