आपल खान्देश

माजी विध्यार्थीला सापडले सोन्याचे ब्रेसलेट! त्याच्या यां प्रामाणिकते बद्दल त्याचा सत्कार कारण्यात आला


सोयगाव – वडगाव , ता सोयगाव केंद्रप्रमुख उमेश महालपुरे सर यांचे साडू व पिंपळगाव हरेश्वर ता पाचोरा येथील कापड दुकानदार श्री.मिलींद दत्तात्रय देव हे दिनांक 7 नोव्हेंबर रोजी कामानिमित्त बनोटी येथे आले होते त्यावेळी त्यांच्या हातात असलेले 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट (साधारण किंमत 1 लाख 10 हजार रुपये) हातातून बनोटी येथे गळून पडले बरीच शोधाशोध केली तरी ते ब्रेसलेट मिळून आले नाही शेवटी ते परत मिळणार नाही असे वाटल्याने श्री देव हे विसरून गेले

मागील आठवड्यात बनोटी येथील दादासो शालीक भिकन खैरनार यांचे चिरंजीव श्री.महेश शालीक खैरनार ज्यांची बनोटी येथे रक्त तपासणी ची लॅब आहे हे वन विभाग कार्यालयासमोर जात असताना त्यांना ते सापडले त्यांनी गावात फक्त मला 22 ग्रॅम ची वस्तू सापडली आहे ओळख पटवून घेऊन जा असे सगळीकडे सांगितले. उमेश महालपुरे सर यांना सदर गोष्ट माहीत झाली सदर महेश हा सरांचा विद्यार्थी असल्याने त्याने लगेच घरी जाऊन वडिलांशी बोलणे करून दिले व तुमचे ब्रेसलेट घेऊन जा असे सांगितले आज ते ब्रेसलेट परत दिले त्यानिमित्ताने सागर कृषी सेवा केंद्र बनोटी येथे महेश खैरनार व त्याचे वडील दादासो श्री शालीक खैरनार यांचा श्री देव यांनी अकरा हजार एकशे अकरा रुपये देऊन सत्कार केला यावेळी बनोटी गावचे प्रथम नागरिक बापूसो मुरलीधर वेहळे, माजी सरपंच श्री सागर पाटील, मुखेड येथील शरद पवार, पत्रकार विकास सोनवणे, श्री राजेंद्र पाटील, डॉ श्री रावसाहेब पाटील, डॉ श्री अजित पाटील, श्री ज्ञानेश्वर सोनार,श्री रमेश चौधरी, श्री बापू कोळी ,श्री सोमनाथ तायगव्हान, मनोज पाटील, अमोल चिकटे व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थ्याच्या व पालकांच्या प्रमाणिकपणाबद्दल शिक्षण विभागातर्फे गोंदेगावचे केंद्रप्रमुख श्री सचिन पाटील, बनोटी केंद्राचे केंद्रप्रमुख नितीन राजपूत सर ,वडगावचे केंद्रप्रमुख श्री उमेश महालपुरे सर, बनोटीचे केंद्रीय मु अ श्री विकास पवार ,श्री संदीप सोनवणे यांनी महेश याचा सत्कार केला

महेश यांच्याबद्दल सांगायचे झाले तर या परिस्थितीत त्याला पाण्याची बोरिंग करणेसाठी 1 लाख रुपयांची तातडीने गरज होती तरी त्याने व त्याच्या वडिलांनी दाखवलेल्या प्रमाणिकपणाबद्दल महेशचे व वडील शालीक दादा खैरनार यांच्या परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे