लोहारा विद्यालयाची मोनाली कोळी ची 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड..
लोहारा विद्यालयाची मोनाली कोळी ची 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड
लोहारा दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथील विद्यार्थिनी सोनाली रमेश कोळी हिची तालुकास्तरीय झालेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेत 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत ती प्रथम क्रमांकाने आली तिची जिल्हास्तरीय होणाऱ्या क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे तिच्या या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन आदरणीय संजयदादा भास्करराव गरुड व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शामराव शेळके सचिव सागरमलजी जैन सहसचिव यु यु पाटील सर सर्व संचालक मंडळ लोहारा विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषीभूषण विश्वासराव आनंदराव पाटील उपाध्यक्ष अ अ पटेल सर स्थानिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ यु डी शेळके मॅडम उपमुख्याद्यापक एस व्ही शिंदे सर पर्यवेक्षक पी एम सुर्वे सर या सर्वांनी तिच्या निवडीबद्दल मोनाली कोळी चे हार्दिक अभिनंदन केलेले आहे तिला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहे तिला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक ए डी गायकवाड, एस एस गुजर, के के बारी या सर्वांचे संस्थेचे चेअरमन सर्व संचालक मंडळ तसेच स्थानिक सल्लागार समिती या सर्वांनी तिला मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे सुद्धा अभिनंदन केलेले आहे



