महाराष्ट्र

शुक्रवारी मध्यरात्री पासून ते रविवारी दुपारपर्यंत, 63 तास मेगाब्लॉक,

मध्य रेल्वेच्या ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांवर एकाच वेळी महा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे, ठाणे स्थानकात आज रात्रीपासून पुढील 63 तास मेगाब्लॉक असेल, तर सीएसएमटी स्थानकात शनिवारी आणि रविवारी असा 36 तासांचा मेगाब्लॉक असेल, या दोन्ही मेगाब्लॉकमुळे शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवशी मध्य आणि हार्बर मार्गावर एकूण 956 लोकल रद्द केल्या जाणार आहेत,

तर या तीन दिवसात एकूण 72 लांब पल्यांच्या गाड्या देखील रद्द असतील, ज्या लोकल सुरू असणार आहेत त्या देखील कर्जत कसारा ते दादर आणि भायखळापर्यंतच धावतील, सी एस एम टी ते भायखळा पूर्णतः बंद असेल, त्याचप्रमाणे हार्बर लाइनवर देखील पनवेल पासून घड्याळापर्यंतच लोकल धावतील, त्यापुढे लोकल धावणार नाहीत, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द केल्याने प्रवाशांना याचा नक्कीच त्रास होणार आहे,

मात्र त्या बदल्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांची आणि ठाणे स्थानकातील पाच आणि सहा नंबर फलाटाची प्रवासिक क्षमता वाढवण्यासाठी हे काम गरजेचे आहे असे मध्य रेल्वे कडून सांगण्यात आले आहे, सहा महिने ज्या कामासाठी लागतील तेच काम केवळ 63 तासांमध्ये ठाणे स्थानकात करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे