आपल खान्देश

नेरमध्ये केमिकलची हेराफेरी : दोन कोटींच्या मुद्देमालासह दोघे जाळ्यात..

 धुळे (प्रतिनिधी) तालुक्यातील नेर गावाजवळील हॉटेल वीर चैतन्यमागे केमिकलचा काळा बाजार करणाऱ्या रॅकेटचा नाशिक आयजींच्या विशेष पथकासह स्थानिक पोलिसांनी शुक्रवार, 4 रोजी पर्दाफाश करीत सुमारे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून अन्य पाच संशयीत पसार झाले आहेत. पोलिसांनी केमिकलचे दोन ट्रक जप्त केले आहेत.

या प्रकरणी अनिलकुमार चव्हाण (बडोदा, गुजरात) व अफजल बेग नियाज बेग मिर्झा (रा. नेर, ता.धुळे) यांना अटक करण्यात आली तर संजय बैसाणे, गणेश जैस्वाल (रा. नेर, ता.धुळे), लवलेस जाट (रा. नेर, ता.धुळे), चालक घेवाराम प्रेमाराम (रा. राजस्थान) व चालक मनाराम हासुराम (राजस्थान) पसार झाले असून सातही संशयीतांविरोधात धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई आयजींच्या विशेष पथकातील पोलिस निरीक्षक बी.जी. रोहोम, सहा.निरीक्षक सचिन जाधव, एएसआय बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, नाईक मनोज दुसाने, सचिन धारणकर, कुणाल मराठे, धुळे तालुक्याचे उपनिरीक्षक काळे, कॉन्स्टेबल सुमित चव्ह औट पोस्टचे ज्ञानेश्वर गिरासे आदींच्या पथकाने

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे