ब्रेकिंग

अक्षय शिंदे यानं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

बदलापूरच्या त्या शाळेतील अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे यानं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. पोलीस ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत एका पोलीस कर्चचाऱ्यासह आरोपीचा प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

बदलापूरच्या अत्याचार प्रकरणी संशयित आरोपी अक्षय शिंदे याला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून अक्षयने तीन गोळ्या स्वतःवर झाडून घेतल्या आहेत. यामध्ये त्यांची प्रकृती गंभीर आहे. यावेळी त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील गोळी लागली असून हा पोलीस कर्मचारी देखील गंभीररित्या जखमी झाले आहेत.

17 ऑगस्टपासून अक्षय शिंदे हा तुरुंगात होता.बदलापूर येथील एका खासगी शाळेतील दोन चार वर्षीय चिमुकल्या मुलींवर त्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप होता. या प्रकरणी तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या पीडीत मुलीच्या पालकांची तक्रार न घेता पोलिसांनी दिवसभर बसवून ठेवल्यानं मोठा गदारोळ माजला होता. या विरोधात बदलापूरकर नागरिक मोठ्या संख्येनं रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन केलं होतं.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे