आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

पारोळा पंचायत समिती ग्रामविस्तार अधिकारीसह कंत्राटी सेवकाला रंगेहात पडकले.

कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी एक टक्का प्रमाणे १ लाख ८० हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या एक मोठी बातमी पारोळा तालुक्यातून समोर आलीय. जळगाव लाचलुचपत विभागाने कामाची वर्कऑर्डर काढण्यासाठी १ लाखाची लाच घेणाऱ्या पारोळा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तार अधिकारीसह कंत्राटी सेवकाला रंगेहात पडकले. सुनील अमृत पाटील (वय-५८) असं ग्रामविस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे तर कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (वय-२८) असं कंत्राटी सेवकाचे नाव असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली. दोघं लाचखोरांविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

धुळ पिंप्री (ता.पारोळा) येथील तक्रारदार रहिवासी असून ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काँक्रीट व पेवर ब्लॉक करण्याचे एकूण एकूण ४ कामे प्रत्येकी १५ लाख रुपये प्रमाणे ६० लाखांचे काम शासनाकडून मंजूर होऊन आले होते. या कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी पारोळा पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी सेवक कल्पेश बेलदार याने ग्रामविस्तार अधिकारी सुनील पाटील यांच्यासाठी दोन टक्के आणि स्वतःसाठी एक टक्का याप्रमाणे १ लाख ८० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.दरम्यान तक्रारदार यांनी या संदर्भात जळगाव येथील लाच लुचपत विभागाला तक्रार दिली. त्यानुसार पथकाने पळताडणीसाठी आज शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचला. यावेळी तडजोडी अंती १ लाख रुपये देण्यासाठी लाचेची रक्कम ठरली. त्यानुसार कंत्राटी सेवक कल्पेश बेलदार याने पंचासमोर १ लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. या संदर्भात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईमुळे पारोळा पंचायत समिती कार्यालयात आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे