आपल खान्देश

पाचोरा तालुक्यात जुगार अड्ड्यांवर छापा ; पावणे नऊ लाखांचा माल हस्तगत


पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे यांच्या आदेशाने भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्या नेतृत्वाखाली जळगाव येथिल एस. आर. पी प्लाटुन तुकडी व भडगाव पोलिस कर्मचार्‍यांच्या सहाय्याने छापा टाकला. या छाप्यात ७ लाख ५१ हजार रूपये किंमतीच्या ३१ मोटारसायकली सोबत १ लाख २१ हजार ५८० रूपये रोख व २१ आरोपी ताब्यात घेण्यात आले.

या गोपनीय कारवाहित रोख रक्कमसह मुद्देमालाची रक्कम ही ८ लाख १५ हजार ५७० रूपयांची कारवाही चकित करणारी आहे. या कारवाहीमुळे नगरदेवळा आऊटपोस्ट पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. या कारवाही प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपींना जामिनवर सोडण्यात आले असुन घटनास्थळी ताब्यात घेतलेली दहा हजार रूपये किंमतीचे एक ईन्व्हर्टर बॅटरी, ३१ मोटरसायकली नगरदेवळा आउऊटपोस्ट पोलिस स्टेशन ताब्यात ठेवल्या आहेत.

याबाबत पाचोरा पोलिस सुञांकडुन मिळालेली माहीती अशी की, १३ मे रोजी राञी भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांना जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी फोन द्वारे नगरदेवळा ते आखतवाडे रस्त्यालगत काही नागरिक बेकायदेशीररित्या एकञ जमले असुन जुगार खेळत असल्याची गोपनीय माहीती प्राप्त झाली आहे. तुम्ही या ठिकाणावर छापा मारुन कारवाही करण्याचे आदेश दिले सोबत जळगाव येथुन आर. सी. पी. प्लाटुन तुकडी पाठवित असल्याचे कळविले. पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांनी लगेच भडगाव पोलिस स्टेशनला कर्तव्यावर असलेले पोलिस उपनिरिक्षक आनंद पटारे, पो. काॅ. ईश्वर पाटील, नितिन रावते व लक्ष्मण पाटील यांना कॅबिनला बोलवुन या कारवाहीची माहीती दिली व जळगाव येथुन येणार्‍या आर. सी. पी. प्लाटुनची वाट पाहत थांबले. राञी १२:१० वाजता पोलिस अधिक्षक यांनी पाठवलेली प्लाटुन व भडगाव येथील निवडक कर्मचारी घेऊन पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांनी घटनास्थळाकडे मार्गक्रमण केले. पोलिस अधिक्षक यांनी दिलेल्या माहीतीप्रमाणे त्या निंबुच्या बागेत लाईट लाऊन जुगार खेळला जात होता. तर शेताच्या बांधावर मोटारसायकली उभ्या करून ठेवल्या होत्या. अशोक उतेकर यांनी यावेळी दोन तुकड्यांमध्ये कर्मचारी विभागुन शेताच्या दोन बाजुंनी छापा टाकला.या छाप्यात २१ जण पोलिसांच्या ताब्यात आले तर काहीजण अंधाराचा फायदा घेउन पळुन जाण्यात यशस्वी झाले.यावेळी ताब्यात घेतलेल्या २१ जणांना नगरदेवळा आउटपोस्ट पोलिस स्टेशनला आणण्यात आले.सोबतच शेताच्या बांधावर असलेल्या ३१ मोटरसायकलीही पौलिस स्टेशनला आणल्या गेल्या.

या प्रकरणी २१ जणांविरुध्द भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस काॅस्टेबल स्वप्निल बाळासाहेब चव्हाण यांच्या फिर्यादिनुसार भाग ०६ गु. र. नं. १८७/२१ महाराष्ट जुगार अॅक्ट कलम १२ (अ),भा. दं. वी. कलम १८८, २६९, २७० सह महा. पोलिस कायदा कलम ३७ (१) ३ चे उल्लंघन कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक नलावडे हे करित आहेत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे