गुन्हेगारीदेश-विदेश

आईने प्रियकराला दिली मुलीवर बलात्काराची परवानगी ; बाळ आजारी पडल्यावर झाला प्रकार उघड!

जगात एकापेक्षा एक असे विचित्र प्रकार घडत असतात. कोण कधी काय करेल याचा काही नेम नसतो. असाच एक प्रकार चेन्नई येथे उघडकीस आला आहे.या प्रकारामुळे मुली घरी सुद्धा सुरक्षित नाही हे या घटनेनंतर सिध्द झाले आहे.

आई म्हटली की यी आपल्या मुलांसाठी काहीही करण्यास तयार असते. काही वेळा तर ती आपला ज8व धोक्यात टाकून आपल्या मुलांचा जीव वाचवण्याचे प्रयत्न करते . पण चेन्नई मधून हॅक धक्कादायक घटना उगजडकीस आली आहे.मातेने पोटच्या अल्पवयीन पोरीवर रेप करण्यासाठी प्रियकराला परवानगी दिली.

या प्रकारात गरोदर राहिलेल्या मुलीने राहत्या घरीच बाळाला जन्म दिला. बाळ आजारी पडले. उपचारासाठी बाळाला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले त्यावेळी सर्व प्रकार उघड झाला. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करुन मुलीच्या मातेला अटक केली. पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले सविस्तर वृत्त दिले आहे. ३८ वर्षांची महिला मोलमजुरी करून दिवस काढत होती. या महिलेची मुलगी ११वीत शिकत होती. महिलेचे एका पन्नाशीच्या व्यक्तीशी संबंध होते. संबंधित पुरुषाने महिलेच्या परवानगीने अल्पवयीन मुलीवर रेप केला. मुलगी गरोदर राहिली, तिने बाळाला जन्म दिला. महिलेने मुलीचे बाळंतपण घरातच केले होते. पण बाळ आजारी पडले आणि गडबड झाली. तब्येत खालावल्यामुळे बाळाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी चौकशी केली आणि संशय आल्यामुळे पोलिसांना बोलाविले. पोलीस आले आणि सगळा धक्कादायक प्रकार उघड झाला.

मुलगी रेपमुळे गरोदर राहिली. यानंतर तिच्या मातेने स्वतःच्या प्रियकराचे पोटच्या पोरीशी झटपट लग्न लावून दिले. मुलीचे शिक्षण बंद करण्यात आले. शेजाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून मुलीला कायम घरात राहण्याचे बंधन घालण्यात आले. ज्यावेळी मुलीला प्रसववेदना जाणवू लागल्या तेव्हा मुलीला बाथरूममध्ये नेण्यात आले. तिथेच मुलीने बाळाला जन्म दिला. बाळ आणि अल्पवयीन मुलगी घरातच असल्यामुळे शेजाऱ्यांना काहीही कळले नव्हते. पण बाळ आजारी पडले आणि सगळा प्रकार उघड झाला.

बाळाची तब्येत बिघडल्यावर त्याला जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. नियमानुसार तिथल्या प्रशासनाने बाळाची तसेच त्याच्या आईवडिलांची माहिती नोंदणीसाठी मागितली. महिलेने वेळ मारून नेण्यासाठी स्वतःचे आधारकार्ड सादर केले. हा प्रकार पाहून प्रशासनाला आणि डॉक्टरांना संशय आला. तातडीने पोलिसांना आणि स्थानिक बाल कल्याण समितीला माहिती देण्यात आली. पोलिसांनी मुलीच्या मातेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. दोघांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरुषावर रेपचेही आरोप ठेवण्यात आले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे