आपल खान्देशसखी

पाचोरा तालुक्यातील ओझर येथे महिला रक्ततपासणी शिबीरास मोठा प्रतिसाद ..

डॉ निळकंठ पाटील वृंदावन हॉस्पिटल,महालॅब व ग्रामपंचायत ओझर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला

पाचोरा तालुक्यातील ओझर येथे महिला रक्त तपासणी शिबीर ठेवण्यात आले होते, तालुक्यातील प्रसिद्ध हॉस्पिटल वृंदावन मल्टीस्पेशल हॉस्पिटलचे संचालक डॉ निळकंठ पाटील, महालॅब व ग्रामपंचायत ओझर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात आला.

पाचोरा तालुक्यातील ओझर गावातील महिलांची रक्त तपासणी करण्यात आली  डॉ निळकंठ पाटील यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन व भारतीय नारी सशक्ती करण व महिला कसे स्वावलंबी होतील अश्या प्रकारे महिलांना मार्गदर्शन केले, कार्यक्रमाची सुरुवात भारत माता प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी ओझर गावातील महिला सरपंच पूजा बबनराव पाटील. गावाचे माजी सरपंच शरद पाटील, विनोद पाटील, व गावातील तरुण मंडळी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे