ब्रेकिंग

Dahi Handi : महाराष्ट्रात दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट, गोविंदाची मृत्यूसोबतची झुंज अपयशी..

परिवाराला आर्थिक मदतीची काँग्रेसने केली मागणी

पाचोरा (झूम मराठी) मंगळवारी राज्यभरात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, पण जळगावच्या पाचोऱ्यात दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलं आहे. पाचोऱ्यात गोविंदाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. उपचारादरम्यान आज अखेर गोविंदाची प्राणज्योत मालवली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील रिक्षा स्टॉपसह स्टेशन रोड परीसरातील युवकांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. यावेळी गोविंदा पथकातील नितीन पांडुरंग चौधरी हा 32 वर्षीय युवक दहीहंडी फोडतांना खाली पडला त्यास रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रूग्णालयात उपचार सुरू असताना आज 28 ऑगस्ट रोजी नितीनची प्राणज्योत मालवली. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी शवविच्छेदन केले.

शोकाकुल वातावरणात आज नितीन चौधरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई वडील आणि दोन भाऊ आहेत. दरम्यान, नितीन हा रिक्षा चालक होता तसेच घरातील कर्ता पुरुष होता. हसतमुख असणारा आणि नेहमी सामाजिक कार्यात सहभागी होणारा म्हणून त्याची ओळख होती. अशातच त्याचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत केली जात आहे. 

नितीनच्या निधनाचे वृत्त मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. यावेळी मयत गोविंदा नितीन चौधरी यांच्या परिवाराला शासनाने मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे