माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे रविवारी राज्यव्यापी अधिवेशन..
- दिलीप जय परदेशी
माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन ही महाराष्ट्रातील जागरुक नागरिकांची व माहिती अधिकार कार्यकर्त्यांची एकमेव सर्वात मोठी संघटना असून संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन दिनांक १८ ऑगष्ट २०२४, सोमवारी रोजी स. १० ते सायं. ५.०० पर्यंत राळेगणसिद्धी येथे आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनासाठी राज्यातील जळगाव जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. राळेगणसिद्धी हे अण्णा हजारे यांचे स्थायिक गाव असून मा. अण्णा हजारे यांचे माहिती अधिकार कायद्याचे जनक म्हणून असलेले योगदान पूर्ण देशाला माहिती आहे. राळेगण सिद्धी ही जागरुक नागरिक व माहिती अधिकार कार्यकर्ते यांची पंढरी असून या विकास आणि ज्ञान पंढरीमध्ये १८ ऑगष्ट २०२४ रोजी राज्याच्या सर्व जिल्हे व विभागातून हजारोंच्या संख्येहून अधिक माहिती अधिकार कार्यकर्ते राळेगणसिद्धी येथे एकवटणार असल्याचा विश्वास माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी व्यक्त केला आहे.
अधिवेशनात कार्यकर्त्यांना मा. अण्णा हजारे यांचे प्रेरणादाई मार्गदर्शन होणार आहे. तसेच माहिती अधिकार क्षेत्रातील तज्ञ मा. विवेक वेलणकर, यशदा प्रशिक्षण संस्थेचे माहिती अधिकार केंद्राचे संयोजक व संशोधन अधिकारी मा. दादू बुळे, तसेच यशदाच्या माहिती अधिकार प्रशिक्षिका रेखा साळुंके यांचे उपस्थित कार्यकर्त्याना अमूल्य मार्गदर्शन लाभणार असल्याने शासन व प्रशासन पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त असावे. त्यांत नागरिकांचा सहभाग असावा या उदात्त हेतूने अण्णा हजारे व अन्य समाजधुरीणांच्या अविरत संघर्षानंतर माहिती अधिकार अधिनियम २००५ साली अस्तित्वात आला आहे.
मात्र गेल्या काही वर्षात हा कायदा प्रभावीपणे राबवण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर खूपच अनास्था असल्याचे दिसून येत आहे. हा कायदा प्रभावीपणे राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी यात सहभागी होणे व या कायद्याचा सामान्य नागरिकांपर्यंत प्रचार व प्रसार होणे ही काळाची गरज असून जागरूक व प्रमाणिक नागरिकाचा मोठा दबाव गट निर्माण झाला तरच माहिती अधिकार कायद्यांच्या अंमलबजावणीतील दोष कमी होतील. व शासन, प्रशासनातील जनतेचा सहभाग वाढून प्रशासन पारदर्शक व जबाबदारीने काम करील. यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे अविरत प्रयत्न चालूच आहेच असे सांगून या अधिवेशनामध्ये जागरुक नागरिकांनी व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सामिल व्हावे असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक सुभाष बसवेकर, शेखर कोलते यांनी केले.



