टॉकीयो ऑलिम्पिकचा महाकुंभ मेळा सुरु असताना जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेतून भारतीयांसाठी गूड न्यूज आलीये. भारताची महिला कुस्तीपटू प्रिया मलिक ने हंगेरीतील स्पर्धेत गोल्डन कामगिरी केलीये. तिने 75 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे
प्रियाच्या या दमदार कामगिरीनंतर तिच्या प्रशिक्षकांनी आगामी ऑलिम्पिकमध्ये ती देशाचे नेतृत्व करेल, असा विश्वास व्यक्त केलाय. प्रियाच्या कामगिरीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावच होताना दिसतोय. हंगेरीच्या बूडापेस्टमध्ये झालेल्या स्पर्धेनंतर विजयी जल्लोश करतानाचा प्रियाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा