कोरोनाबाधित, मोक्का आरोपी दीप्ती काळे हिची ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
पुणे- ससून रुग्णालयातील कोविड इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून ‘मोक्का’ च्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या दीप्ती काळे या महिलेने आत्महत्या केली. आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
दीप्ती काळे हिच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या पार्श्वभूमीमुळे पुणे पोलीस आणि तिच्यावर आजच मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी तिला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर तिचा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आल्यामुळे तिला ससून रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये ॲडमिट करण्यात आले होते.
दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास तिने रुग्णालयातील बाथरूम मधून खाली उडी मारली. यामध्ये गंभीररित्या जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा