शाळेतल्या विद्यार्थ्यांची निघाली जनजागृती दिंडी ; पिंपळगाव बांबरूड शाळेचा अनोखा उपक्रम..
- दिलीप जय परदेशी
भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बांबरूडच्या बाबा सुंदरदास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचीं जनजागृती दिंडी ह्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल नामाच्या गजरात पिपंळगावच्या बाबा सुंदरदास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमीक शाळेत दिंडी सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी येथे अवघी पंढरी अवतरल्याचे चित्र निर्माण झाले होते, यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची जनजागृती दिंडी काढून साऱ्यांचे लक्ष वेधले, विद्यार्थिनी तुळशी वृंदावन घेऊन वृक्षारोपणाचा संदेश दिला. सर्वांनी मिळून या दिंडीत सहभाग नोंदवला आषाढी एकादशीचे औचित्य साधून विद्यालयाच्यावतीने वारकऱ्यांच्या पोशाखात शाळेतील मुलांनी पंढरीची वारी सोबत शिक्षणाची वारी पिंपळगाव बुद्रुक येथे सवाद्य मिरवणूक काढून साजरी केली.यावेळी उपस्थित होते. फुलांनी सजविलेल्या माऊलीच्या पालखीची ढोल, ताशा, लेझीमच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी आणि नागरीकांनी पालखीचे पूजन करून विठुरायाचे दर्शन घेतले.
या दिंडी सोहळ्यात शाळेतील विद्यार्थी वारकरी व पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. वृक्षदिंडीतून पर्यावरण संरक्षणाचा संदेश
’ज्ञानोबा तुकाराम’चा गजर करत ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ नुसार ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या घोषणा देण्यात आल्या, ही दिंडी आदिशक्ती एकविरा माता मंदिरापासून सुरुवात करण्यात आली याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भरत पाटील, संस्थेचे सचिव रविकांत सूर्यवंशी, संस्थेचे खजिनदार अशोक पाटील, संस्थेचे संचालक साहेबराव सुभाष पाटील व संजय पाटील यांनी पांडुरंगाच्या पालखीचे विधिवत पूजन करून वारीत सहभाग नोंदवला तसेच गावातील जेष्ठ नागरिकांनी विठ्ठलाचे औक्षण करून भक्तीभावाने या दिंडीत सहभागी झाले, महिलांनी फुगड्या खेळुन वारीत आनंद लुटला, वारीच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य बी जी पाटील सर तसेच सर्व शिक्षक बंधू शिक्षिका भगिनी शिक्षिकेतर कर्मचारी गावातील आजी-माजी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


