आपल खान्देशमहाराष्ट्रसखी

नांदगावच्या शिवकन्या संगीता सोनवणे यांना जळगाव राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित..


झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) नांदगाव येथील शिवकन्या सौ संगीता सोनवणे यांना जळगाव येथील वसु नंदिनी फाउंडेशन जामनेर संचलित एम के व्हेचर जळगाव आणि साहित्य सरिता मंचतर्फे राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार 2023 मिसेस युनिव्हर्स संगीता खैरनार व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सौ संगीता सोनवणे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सदरचा राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या आधी देखील सौ संगीता सोनवणे यांना पनवेल, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नांदेड आणि नाशिक आधी ठिकाणी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच नांदगाव नगर परिषदेच्या वतीने देखील माझीइ वसुंधरा व स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. सौ संगीता सोनवणे यांना मिळालेल्या या पुरस्काराची नांदगाव तालुक्यातील जनतेसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिक यांनी दखल घेतली असून सर्व थरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. सौ संगीता सोनवणे या कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. शिव पूजा हा नित्यक्रम याशिवाय अनेक गरजवंतांना देखील कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी न करता मदत करत असतात.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे