आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

लोहारा जिल्हा परिषद मराठी कन्या शाळेच्या शाळाव्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दीपक पवार तर उपाध्यक्षपदी प्रल्हाद चौधरी यांची निवड..


लोहारा (प्रतिनिधी- दिलीप राजपूत) पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळेत दोन वर्षांसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले.यात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदीदिपक वामनराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

वेळी १ ली ४ थीच्या पालकामधून ९ सदस्यांची निवड शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून दिपक वामन पवार, उपाध्यक्ष म्हणून प्रल्हाद नामदेव चौधरी तर सदस्य म्हणून प्रकाश शंकर सोनवणे, गजानन सरोदे, विद्या अनिल मेहरे, मंगला भरत लोहार, सोनी जगदीश तेली, लता पुंडलिक भिवसने, जयश्री कृष्णा कोळी यांची निवड पालकांनी केली. तर शिक्षक प्रतिनिधी श्रीमती संध्या पाटील,सचिव तथा मुख्याध्यापक विजयसिंग राजपूत व शिक्षणतज्ञ म्हणून दत्तात्रय भोसांडे यांची निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक पवार यांचा सत्कार मुख्याध्यापक विजयसिंह राजपूत यांनी केला. तर उपाध्यक्ष प्रल्हाद चौधरी यांचा सत्कार कृष्णा तपोने यांनी केला.तर सर्व सदस्यांचा सत्कार शिक्षक वृंद यांनी केला.यावेळी जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असून शाळेत विविध उपक्रम व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीअध्यक्ष दिपक पवार यांनी सांगितले.

दिपक पवार यांच्या निवडीबद्दल त्यांचे पंचायत समिती माजी उपसभापती अनिता चौधरी, भाजपचे युवा नेते माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, उपसरपंच दिपक खरे, डॉ. केयुर चौधरी, डॉ. सुभाष घोंगडे, शरद सोनार, वृत्तपत्र पत्रकार मंच अध्यक्ष चंद्रकांत पाटील, खान्देश न्यूजचे संपादक महेंद्र शेळके, कृष्णराव शेळके, रमेश शेळके, ज्ञानेश्वर राजपूत, दिलीप चौधरी, गजानन क्षीरसागर, विकासो चेअरमन सुनिल क्षिरसागर, रमेश लिंगायत, संभाजी चौधरी, जि प.मुलांची शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीअध्यक्ष सुनिल खरे, प्रविण चौधरी, अतुल कोळी, भास्कर रद्द भोई, अमोल पाटील,नंदू सुर्वे,शेणफडू कोळी, राजू गिते, अनिल तडवी, शरद कोळी, सादिक खान आदींनी अभिनंदन व कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे