आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

MPSC परीक्षेत भटक्या जमातीमधून प्रदीपकुमार डोईफोडे राज्यात प्रथम!

अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नांमध्ये भटक्या जातीतील प्रवर्ग ' ( NT- D) मधून प्रथम तर राज्यामधून २६ वी रँक मिळवण्याचा बहुमान पटकावला आहे.

झूम मराठी

सिंदखेड राजा (जि. बुलढाणा): तालुक्यातील रहेरी खुर्द येथील प्रवीण कुमार गजानन डोईफोडे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नांमध्ये भटक्या जातीतील प्रवर्ग ‘ ( NT- D) मधून प्रथम तर राज्यामधून २६ वी रँक मिळवण्याचा बहुमान पटकावला आहे. त्यामुळे मातृतीर्थ च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रदीप कुमार एमपीएससी परीक्षेत राजपत्रित अधिकारी बनणार आहे लवकरच होणार आहेत. तालुक्यातील राहिरे खुर्द या सातशे ते आठशे लोक वस्ती मधून असलेल्या गावामध्ये त्यांचे जल्लोषात स्वागत केले गेले आहे. शेतकरी कुटुंबातील गजानन डोईफोडे यांच्या कुटुंबामध्ये कोणत्याही व्यक्ती प्रशासकीय सेवेत नाही परंतु शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन सुद्धा प्रदीप कुमार डोईफोडे यांनी अभ्यासाच्या जोरावर प्रशासकीय सेवेत दाखल झालेले आहेत.

प्रदीप कुमार जनार्दन डोईफोडे यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्ण झालेले आहे त्यानंतर माध्यमिक शिक्षण देऊळगाव राजा येथे पूर्ण झाले त्यानंतर त्यांनी इयत्ता ११ व १२ पर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेमधून पूर्ण केले सिविल इंजीनियरिंग ची आवड असल्यामुळे त्यांनी जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथील नामांकित महाविद्यालयात पूर्ण केले इंजिनिअरिंगचा अभ्यास करत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली सण २०१८ मध्ये त्यांनी सिविल इंजिनिअरिंग मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले व अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे क्लासेस न लावता स्वतःच्या अभ्यास करण्याकडे भर दिला व परिश्रमाच्या जोरावर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी सारख्या मोठ्या परीक्षेत प्रावीण्य मिळवले व राज्यामध्ये मधून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला सिविल इंजीनियरिंग च्या पदवी मिळविल्यानंतर त्यांनी अनेक नामांकित कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळत होती परंतु प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याची त्यांची जिद्द होती व तशी मनाची तयारी सुद्धा केली होती कॉलेजचे शिक्षण सुरू असताना औरंगाबाद या ठिकाणीच अभ्यासाची सुरुवात केली.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सण २०१९ मध्ये एमपीएससी सिविल इंजीनियरिंग च्या परीक्षेची जाहिरात निघाली त्यानंतर आपणही प्रशासकीय सेवेमध्ये दाखल होऊ शकतो ही मनाची खूणगाठ बांधली व जोमाने अभ्यासाला सुरुवात केली आई वडीला कडून सुद्धा अभ्यास करण्याचे प्रोत्साहन मिळत होते तासन तास फक्त अभ्यासाकडे लक्ष दिले जून २०१९ ला पूर्व परीक्षा दिली पूर्व परीक्षेमध्ये यश संपादन केल्यानंतर २४ नोव्हेंबर २०१९ मध्ये मुख्य परीक्षा दिल्यानंतर त्यांचा निकाल सण २०२१मध्ये लागला त्यामध्ये उत्तीर्ण होऊन जानेवारी २०२० ला विभागीय स्तरावर मुलाखत दिली. त्याचा निकाल १२ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला असून प्रदीप कुमार जनार्दन सोनवणे यांनी भटक्या जमातीतील प्रवर्ग द मधून राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे तर राज्यांमधून २६वी बँक प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे