आपल खान्देशमहाराष्ट्र

पुनगाव व मांडकी परिसरात आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण

एक मुलं, एक वृक्ष या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यात आले यात गावकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला

पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली‌. या वृक्षारोपण कार्यक्रमा हा पुनगांव ग्रामपंचायत व सरस्वती फाऊंडेशनच्या एक मुलं, एक वृक्ष या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यात आले यात गावकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

पाचोरा तालुक्यातील पुनगांव ग्रामपंचायत व सरस्वती फाऊंडेशन पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने पुनगांव ग्रामपंचायत परिसरात पाचशे झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.  पुनगांव जिल्हा परिषद शाळा, मांडकी जिल्हा परिषद शाळा परिसरात लावण्यासाठी परिक्षेत्र वनीकरण विभागाच्या वतीने पुरवण्यात आली आहेत, तर बेलाची झाडे पूनगावातील  नागरिक राजेंद्र मोतीलाल परदेशी, तर  लिंबाची झाडे व उपसरपंच अनिल परदेशी उपलब्ध करून देणार आहेत उर्वरित झाडे ग्रामपंचायतने उपलब्ध करून दिली.

यावेळी आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या सह सरस्वती फाऊंडेशनचे अध्यक्ष रवींद्र राजपूत, पुनगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती सुनिता चिंतामण पाटील, उपसरपंच अनिल परदेशी, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद गुजर, अनिल पाटील, मनोज मोरे, शिवलाल मोची आबा सोनवणे, नारायण मोची, विकास सोसायटीचे चेअरमन प्रल्हाद पाटील, संचालक, सिताराम पाटील, बाजीराव पाटील, वृक्षसंवर्धन समितीचे पदाधिकारी चिंतामण पाटील, नवीन गुजर, दिपक सुरवाडे पोलीस, प्रदिप परदेशी पोलीस, नटू परदेशी, संदिप परदेशी, संजय ब्राह्मणे, यांच्या सह जिल्हा परिषद शाळा पुनगांव चे मुख्याध्यापक पाचोळेसर, शिक्षक अनिल वराडे, महाले सर, राजपूत सर, शारदा पाटील, शितल महाजन व मांडकी शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव सुरवाडे सर, जयवंत पाटील सर, माजी सरपंच प्रविण अप्पा पाटील, पोलीस पाटील प्रवीण ठाकूर, , ग्रामसेवक विकास पाटील, सेक्रेटरी सुनील पाटील, सरस्वती फाऊंडेशनचे रविंद्र राजपूत, दिपक पाटील,व टिम, सामाजिक वनीकरण विभागाच्या परिक्षेत्र अधिकारी सरिता पाटील, प्रकाश पाटील, कृषी सहायक जाधव, कृषी सहायक संगिता पाटील मॅडम यांच्या सह ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना आमदार किशोर पाटील यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले, एक विकास काम कमी करा पण वृक्षारोपण करून ती झाडे शंभर टक्के जगवा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल वराडे सर यांनी तर प्रास्ताविक चिंतामण पाटील यांनी व आभार प्रदर्शन विकास पाटील ग्रामसेवक यांनी मानले.

https://x.com/DILIPJP21411/status/1810221892566933646?s=19

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे