स्वित्झर्लंडमध्ये आधीपासूनच इच्छामृत्यूला कायदेशीर परवानगी आहे. आता एका मिनिटात कुठलाही त्रास न होता शांततापूर्ण मृत्यू देणाऱ्या यंत्राला (Suicide Machine) कायदेशीर परवानगी देण्यात आली असल्याचे या यंत्राच्या निर्मात्यानं सांगितलं आहे.
स्वित्झर्लंडमध्ये इच्छामृत्यू कायदेशीर आहे. गेल्या वर्षी सुमारे 1,300 लोकांनी इच्छामृत्यूसाठी एनजीओच्या सेवांचा वापर केला होता. त्याच पार्श्वभूमीवर एक्झिट इंटरनॅशनल या एनजीओचे संचालक डॉ. फिलीश नित्शके यांनी हे यंत्र तयार केले असून त्यांना डॉ. डेथ नावाने देखील ओळखले जाते. एखादी व्यक्ती शरीराच्या कुठल्याही अवयवाची हालचाल करत नसेल आणि फक्त डोळे मिचकावत असेल अशा परिस्थितीतही हे यंत्र काम करणार आहे. मृत्यूची इच्छा असलेल्या व्यक्तीच्या आवडत्या ठिकाणी यंत्राला नेलं जातं. त्यानंतर ऑक्सिजनची पातळी अतिगंभीर पातळीवर आणून त्या व्यक्तीला इच्छामरण दिले जाते. याबाबत इंडिपेंडेंट यूकेने याबाबत वृत्त दिले आहे.
इच्छामृत्यूसाठी यंत्र तयार करणं हे आमच्यासाठी खूप मोठं काम होतं. आता या यंत्राला परवानगी मिळाली आहे. वापरताना या यंत्रामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. येत्या २०२२ मध्ये हे यंत्र मृत्यूची इच्छा असलेल्या लोकांच्या सेवेत असेल, असेही डॉ. फिलिप म्हणाले. दरम्यान, अनेकांनी या यंत्रावर टीका देखील केली आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा