आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

वाडे येथे विघ्नहर्ता मल्टीस्पेशालि भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

भडगाव (प्रतिनिधी) वाडे ता भडगाव येथे विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & डॉ.भूषण मगर- पाटील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ पत्रकार अशोक बापू परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पाचोरा भडगावचे प्रसिद्ध विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & डॉ.भूषण मगर- पाटील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ पत्रकार अशोक बापू परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमात गावातील आजी-माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला .अशोक बापू यांना डॉ.भूषण मगर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच प्राथमिक शाळेत डॉ.भूषण मगर-पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.प्रसंगी डॉ.भूषणदादा मगर यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला डॉ.भूषणदादा मगर, मा.अमोलभाऊ शिंदे,माजी सैनिक समाधान पाटील,सरपंच,उपसरपंच, पोलिस पाटील,माजी सैनिक,आशासेविका, विविध क्षेत्रातील लोकांनी उपस्थिती दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे