सरस्वती फॉउंडेशन ‘एक मुलं, एक वृक्ष’ स्तुत्य उपक्रमा अंतर्गत पाचोऱ्यात वृक्षारोपण..
एक मुलं एक झाड या संकल्पनेतून सरस्वती फॉउंडेशनच्या वतीने गोकुळ धाम व साई गणेश कॉलनी येथे वृक्षारोपण करण्यात आले, एक मुलं एक झाड, संकल्पनेत वृक्षप्रेमींनी सहभाग घेतला होता.
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे या संत वचनाप्रमाणे वृक्षांचे महत्त्व आमच्या जीवनात अनन्यसाधारण आहे. निसर्ग आपले आरोग्य जपतो. मग साहजिकच निसर्गाची जपणूक ही आपली जबाबदारी समजून पाचोरा येथील समाजसेवक रवींद्र राजपूत यांच्या माध्यमातून सरस्वती फॉउंडेशन आयोजित एक मुलं, एक वृक्ष ही मोहिम सुरु कारण्यात आली आहेत पाचोरा भडगाव तालुक्यात ठीक ठिकाणी वृक्षारोपण करून एक मुलं, एक वृक्ष नारा देण्यात आला. पाचोरा शहरातील गोकुळ धाम सोसायटी येथे पाचोरा नगर पालिकेचे प्रशासक देवरे व पाचोरा पोलीस अधिकारी गंणगे साहेब व परिसरातील नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, वृक्षारोपण करून मोकळे, झाले नाही तर यावेळी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी वाटून घेण्यात आली. या वृक्षारोपणामध्ये प्रामुख्याने लिंब, वड, सिसम आंबा, पिंपळ, कडुलिंब, पळस, अर्जुन, भोकर, बेल या देशी झाडांची लागवड करण्यात आली.



