आपल खान्देश

धनगरां विरुद्ध दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी, महामार्गावर मेंढ्या सोडत मेंढपाळांचा रास्तारोको..!

 

सुरत-नागपूर महामार्गावरील महिर फाट्यावर मेंढ्या सोडून रास्तारोको

धुळे जिल्हातील साक्री तालुक्यातील महिर, टेंभे प्र.भडगाव, वर्धान, नागपूर, लखमापूर, घाणेगाव पैकी रामनगर या गावांमधील पारंपारिक गुरचरण, गायरान वनजमिनीवर होणारे अतिक्रमण थांबविण्यासह गावांमधील ठेलारी, मेंढपाळ, धनगर लोकांविरुद्ध दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशा आदी मागण्यांसाठी गुरुवार (दि. ४) रोजी जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हाध्यक्ष रमेश सरक यांच्या नेतृत्वाखाली महिला व मुलांसह शेकडो समाज बांधवांनी सुरत-नागपूर महामार्गावरील महिर फाट्यावर मेंढ्या सोडून रास्तारोको आंदोलन केले आहे.

आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होवून दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आंदोलनाची माहिती मिळताच साक्री पोलिसांसह तहसीलदार साहेबराव सोनवणे व वनविभागाच्या अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी रमेश सरक यांच्यासह आंदोलकांशी चर्चा करून बुधवार (दि.१०) रोजी बैठक घेवून मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. अर्धा ते पाऊण तास झालेल्या आंदोलनामुळे वाहनधारक, प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांना देखील ताटकळत थांबावे लागले. 

आंदोलनात धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश सरक, रावण शिवाजी सरग, भटू काळु सरक, सखाराम तापीराम टेंभे, गोरख नारायण मारनर, दगडू उदा गोरे, चिमा मरू लकडे, गुलाबा गेंदा गोरे, आबा मकन कोळपे, गोरख रघु सुसालदे, काळु राजु गोयेकर, विलास वाघमोडे, संजु गोयेकर, सोनू आप्पा टकले, नामदेव टकले, गोरख बळीराम गोयेकर, काळू उत्तम सरग, नथ्थू भाऊ कोरडकर, दयाराम बापू गरदरे, संजय मारनर, धोंडू भटू मारनर, संदीप पितांबर सरग, रामदास भिला सरग आदींसह ठेलारी, मेंढपाळ, धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

विविध मागण्यांसाठी धनगर समाज संघर्ष समितीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देवून रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला. मात्र मागण्यांबाबत प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने रमेश सरक यांच्या नेतृत्वाखाली ठेलारी मेंढपाळ धनगर समाज बांधवांनी एकत्र येत महिर फाट्यावर महामार्गावर एकाबाजुला ॲॅपेरिक्षा, पाणीटँकर उभे करीत तर दुसऱ्या बाजुला मेंढ्या चरण्यासाठी सोडून रास्तारोको आंदोलन केले. मेंढपाळांकडून यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे