Lohara News | लोहारा विद्यालयात कायदेविषयक जनजागृती आणि मार्गदर्शन..
लोहारा येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीद्वारा संचलित डॉ. जे जी पंडित माध्यमिक विद्यालयात आज रोजी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले होते.
याप्रसंगी पिंपळगाव हरेश्वर येथील पीएसआय अमोल पवार, क्राइम ब्रांच प्रमुख अरुण राजपूत, लोहारा येथील कॉन्स्टेबल शैलेश चव्हाण, लोहारा येथील पोलीस पाटील सुरेंद्र शेळके, तसेच पत्रकार कृष्णा आप्पा शेळके, दिलीप राजपूत, चंदू खरे उपस्थित होते विद्यालयाच्यावतीने विद्यालयाचा मुख्याध्यापिका श्रीमती यु डी शेळके यांनी विद्यालयात उपस्थित पी एस आय अमोल पवार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला उपस्थित पोलीस बांधवांचा पत्रकार बंधूंचा विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी एम सुर्वे यांनी केले कायद्यात झालेले बदल याविषयी माहिती दिली तसेच उपस्थित पीएस आय अमोल पवार यांनी विद्यार्थ्यांना 1 जुलै 2024 पासुन भारतीय संविधान रचनेनुसार कायद्यामध्ये झालेले बदल नियमात झालेले बदल ऑनलाईन पद्धतीने सुद्धा गुन्हा नोंदवल्या जाऊ शकतो याविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली विद्यालयाचे उपमुख्यध्यापक एस व्ही शिंदे, पर्यवेक्षक पीएम सुर्वे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन पाटील यांनी केले व आभार पी यु खरे यांनी मानले.



