आपल खान्देश

पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक कामाचा श्रीगणेशा

पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथे धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारकाच्या कामास प्रारंभ करण्यात आला असून लवकर हे स्मारक पूर्ण होईल 

पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथे धनगर समाजाचं आराध्य दैवत असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक होण्यासाठी आखतवाडे येथील ग्रामस्थांकडून नगरदेवळा बाळद जि.प.गटाचे मा.सदस्य,तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब जिभाऊ यांच्यासह तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांच्याकडे मागणी केल्याने आमदार महोदयांनी आखतवाडे येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक बांधकाम लवकरच पूर्ण करण्याचे सांगितल्याने आज प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यात आल्यावर आखतवाडेसह परिसरातील ग्रामंस्थासह धनगर समाजातील आबालवृद्ध मंडळीत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.  सदर कामासाठी मा.सरपंच धनसिंग आप्पा गढरी, मा.सरपंच संजय परदेशी,बापु दयाराम, चांगदेव पुंडलिक, दर्पण बापु,पंडित बापूजी,छोटू नाना,राजेंद्र नामदेव, मुरलीधर निंबा,यांच्यासह गोविंद राजपुत, ग्रामपंचायत सदस्य राहुल राजपुत, सुनिल राजपुत, ईत्यादींसह ग्रामस्थांकडून मागनी करुन पाठपुरा करण्यात आला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे