आपल खान्देश

धुळ्यात महापौरांनी गरजूना वाटले रेमडेसिव्हिर

खडतर स्थितीत आणि गरजूंना इंजेक्शनसाठी वणवण करावी लागत असताना महापालिकेने इंजेक्शनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तो फलदायी ठरला आहे.

धुळे (वृत्तसंस्था): कोरोनाग्रस्तांना निकषानुसार आवश्‍यक ठरणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनप्रश्‍नी केवळ वल्गना, पत्रकबाजी, टीकाटिप्पणी न करता महापालिकेने कृतीवर भर दिला आहे. यात महापालिकेला पहिल्या टप्प्यात चारशे, तर दुसऱ्या टप्प्यात अकराशे इंजेक्शन प्राप्त झाले. त्याचे गरजूंना वाटप सुरू असल्याचे महापौर चंद्रकांत सोनार यांनी सांगितले.

महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. तसेच भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे, शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी इंजेक्शन आणत गरजूंना उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी आणि भाजपमध्ये विविध मुद्यांवरून राजकारण होत आहे. त्यात रेमडेसिव्हिर वाटपाचा मुद्दा अग्रस्थानी आहे. या पार्श्वभूमीवर महापौर सोनार यांनी भूमिका मांडताना सांगितले, की महापालिका क्षेत्रात गेल्या दिवसांपासून शासनामार्फत रेमडेसिव्हिरचा पुरवठा झालेला नाही. खडतर स्थितीत आणि गरजूंना इंजेक्शनसाठी वणवण करावी लागत असताना महापालिकेने इंजेक्शनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तो फलदायी ठरला आहे.

महापालिकेच्या निर्णयामुळे गरजू रुग्णांना इंजेक्शन मिळते आहे. याकामी भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, तसेच भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने शहरातील रुग्णांची गरज ओळखून रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा होत असलेला पुरवठा संजीवनी ठरत आहे. महापालिकेचे आयुक्त‍ अजीज शेख यांनी ही सकारात्मक भूमिका घेत केलेली तातडीची कार्यवाही अभिनंदनीय आहे.

महापालिकेला पहिल्या टप्प्यात महापालिकेस चारशे, तर दुसऱ्या टप्प्यात अकराशे इंजेक्शन प्राप्त झाले. ते पारदर्शकतेने रुग्णांपर्यंत पोचविण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत शासनाकडून दोन दिवसांपासून इंजेक्शनचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला असताना महापालिकेमार्फत होणारा पुरवठा रुग्णांना दिलासादायक ठरला आहे. या कार्यात अतिरिक्त आयुक्‍त गणेश गिरी, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, औषधनिर्माता संजय गुजर व अन्य अधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे