आपल खान्देश

पाचोर्‍यात शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा..

वैशालीताई सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती


पाचोरा, दिनांक ९ ( प्रतिनिधी ) : येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात आज पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यासंदर्भातील वृत्त असे की, आज सर्वत्र शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पाचोर्‍यात देखील आज मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून भगवा झेंडा फडकवण्यात आला. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजीने परिसर दुमदुमला फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली.

याप्रसंगी तिलोत्तमा मौर्य, रमेश बाफना, अरूण पाटील, उध्दव मराठे, अरूण तांबे, दिपकसिंग राजपूत, हरी पाटील, अनिल सावंत, निखिल पाटील, दिपक पाटील, भरत खंडेलवाल, राजू काळे, खंडू सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, अभिषेक खंडेलवाल, पप्पू जाधव, संदीप जैन, मनोज चौधरी, हरिष देवरे, भूपेश सोमवंशी, इमरान पिंजारी, गफ्फार भाई, आवेश खाटीक, गौरव पाटील, चंदू पाटील, प्रवीण शिंपी, नामदेव चौधरी, डी.डी. नाना, गांगूर्डे अप्पा, धरमसिंग पाटील , देवीदास पाटील यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे