शिवसेनेच्या वर्धापनदिना निमित आखतवाडे येथे वृक्षारोपण..
पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून आणि नगरदेवळा बाळद जिल्हा परिषद गटाचे सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आज सकाळी वृक्षारोपण करण्यात आले.
आज शिवसेनेचा वर्धापन दिवस यानिमित्ताने वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा करायचा अशी संकल्पना आमदार किशोर पाटील यांनी जाहीर करताच पाचोरा व भडगाव तालुक्यातील ठीक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले नगरदेवळा बाळद जिल्हा परिषद गटाचे सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाने आखातवाडे गावात मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी आखतवाडे येथील माजी सरपंच धनशिंग आप्पा गढरी, माजी सरपंच संजय परदेशी,माजी सरपंच जाकीर शेख, ग्रामपंचायत माजी सदस्य जितेंद्र राजपुत, ऊर्जा राजपुत, चंद्रसिंग राजपुत, जयसिंग राजपुत, पंडीत गढरी, राजेंद्र गढरी, गोविंदसिंग प्रकाश राजपुत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



