आपल खान्देशब्रेकिंग

Pachora | पाचोऱ्यातील शिंधी समाजाने दुकाने न उघडण्याचा घेतला निर्णय..

येत्या सोमवारी 22 जानेवारीला अयोध्या राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा पार पडणार आहे. या भव्य सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. देशाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलं आहे. रामललाच्या (Ram Lala) प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा उत्सव फक्त अयोध्येतच नाही तर संपूर्ण देशभरात पाहायला मिळणार आहे या अनुषंगाने पाचोऱ्यातील सर्व शिंधी  बांधवानी या दिवशी आपली दुकाने बंद राहणार असे घोषित केले. तमाम शिंधी समाजाने घेतलेला निर्णय म्हणजेच त्याचे काटेकोर पालन होतेच. गरीब असो की श्रीमत ते याचे पालन करतातच, समाज माध्यमातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

  • महाराष्ट्र सरकारकडूनही सुट्टी

महाराष्ट्र सरकारनेही 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य सरकारकडून यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून 22 जानेवारीला शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालये तसेच निम-शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे देण्यात आला आहे. 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे