आपल खान्देश

पाचोरा शहरासह तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी..


पाचोरा (संजय परदेशी- आखतवाडे) पाचोरा शहरासह तालुक्यात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, पाचोरा शहरातील धनगर समाज बांधवांनी सकाळी जळगांव चौफुलीवर अहिल्यादेवी चौकात प्रतीमा पुजन केले.

यावेळी धनगर समाजातील सर्वश्री कीशोर पेंढारकर, धोंडू हटकर, नगरसेवक बापु हटकर, विशाल हटकर, निवृत्ती हटकर, यांचेसह समाज बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थित होती. 

तसेच सायंकाळी तालुक्यातील आखतवाडे येथे अहिल्यादेवी होळकर चौकात स्थानिक आमदार किशोर आप्पा पाटील आणि जळगांव जिल्हा परिषदचे माजी सदस्य रावसाहेब पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे हस्ते 10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी समाज बांधवांसह महिला मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच कल्पना गढरी, मा.सरपंच धनसिंग आप्पा, माजी सरपंच संजय परदेशी, बापु परदेशी, छोटु नाना, रवी मास्तर, दर्पण गढरी, ग्रामपंचायत सदस्य राहुल राजपुत, जितेंद्र राजपुत, गोविंदा राजपुत, चांगो पुंडलिक, पंडीत निंबा, मनोज रघुनाथ, व इतर समाजातील युवा मंडळने परीश्रम घेतला होता.

आखतवाडे, येथुन जवळच असलेल्या तालुक्यातील बदरखे येथे आमदार किशोर आप्पा पाटील,  जि.प.सदस्य रावसाहेब जिभाऊ यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन सवाद्य मिरवणुक काढण्यात आली, यावेळी समाज बांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  सकाळी होळ येथे समाज धनगर बांधवांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने मुख्य चौकात प्रतीमा पुजन करण्यात आले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे