आपल खान्देशकृषीवार्तामहाराष्ट्र

पाचोऱ्यातुन सरस्वती फॉउंडेशन संस्थेच्या वतीने ‘एक मुलं एक वृक्ष’ मोहीमेस लाभतोय चांगला प्रतिसाद..


पाचोरा (झूम मराठी) सरस्वती फौंडेशनच्या वतीने एक मुलं, एक वृक्ष मिशन 2024 हा उपक्रम पाचोरा शहरातून 9 मे रोजी क्रांती सूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जन्मोउत्सवा निमित्त सुरु केला असता आता त्याचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणात झाल असून या मोहिमेस चांगला प्रतिसाद लाभत आहे.

यावर्षीच्या उष्णतेने राज्याला अशा काही झळा दिल्या आहेत की, यामुळे उष्णतेने काय आणि किती त्रास होऊ शकतो हेच दाखवून दिले आहे. उत्तर महाराष्ट्र मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे, सिमेंटच्या इमारती घरे वाढली पण कोणीच झाडे लावली नाही, गावा गावात वृक्षाची संख्या कमी होतांना दिसत आहेत वृक्ष लागवड करण्यात आली नाही हे लक्षात घेता म्हणून सरस्वती फौंडेशनच्या वतीने एक मुलं, एक वृक्ष मिशन ह्या मोहिमेस पाचोऱ्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहेत असे मत रवींद्रसिह राजपूत यांनी बोलतांना सांगितले.

या मोहिमे अंतर्गत शहारात ठीक ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येत आहे आज पाचोरा शहरातील दक्षिणेश्वर श्री हनुमान मंदिर परिसर आणि जय किरण कॉलनी या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे