महाराष्ट्र
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्लोबल टीचर सुनील म्हसकर सर यांचे युवकांसाठी व्याख्यान संपन्न
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्लोबल टीचर सुनील म्हसकर सर यांचे युवकांसाठी व्याख्यान संपन्न झाला
‘भारत देशाची युवा पिढी सशक्त तर देश सुदृढ’ त्यामुळे भारत देशाचा 75 वे वर्ष सर्वत्र आरोग्यदायी अशा “फ्रीडम रन” या संकल्पनेवर साजरा केला जात आहे. याचाच ऐक भाग म्हणजे भारत सरकार नेहरू युवा केंद्र ठाणे (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय) नव युवाशक्ती, शहापूर महाराष्ट्र आणि सत्य साई समिती तळवाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आझादीचा अमॄत महोत्सव इंडिया@75 डोळखांब विभागातील तळवाडे येथे 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून साजरा करण्यात आला.
संस्थेच्या अध्यक्षा कुमारी नुपूर मंगेश धिमते यांच्या नेतृत्वाखालील युवकांनी वृक्षारोपण करून ‘फ्रीडम रन’ हा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये शहापुर तालुक्यातून 80 हून अधिक युवक युवती सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ग्लोबल टीचर अवॉर्ड सन्मानित स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच ठाणे येथील श्रीरंग विद्यालयाचे सहशिक्षक श्री.सुनील म्हसकर सर उपस्थित होते! सरांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना म्हटले की, “युवक हे देशाचे आधारस्तंभ आहेत! युवकांनी जीवनात विविध संकटांचा सामना करत नानाविध कौशल्ये धारण करून आपले जीवन फुलवावे! युवक-युवतींनी शरीराबरोबर मनाचेही उत्तम आरोग्य ठेवावे! तरुणांनी मोबाईलकडे जास्त आकर्षित न होता, ताण-तणाव मुक्त असे आनंदमयी, निरामयी जीवनशैलीकडे विशेष लक्ष द्यावे! उत्तम स्वास्थ आणि निरोगी शरीर व मन ठेवणे हीच आजच्या काळाची गरज आहे! तरच उद्याचा भारत एक सक्षम, समर्थ आणि बलशाली राष्ट्र घडू शकेल!” यावेळी श्री.म्हसकर सर यांनी आपल्या सुरेल स्वरात युवक युवतींना प्रेरणादायी अशी देशभक्तीपर, स्फूर्तीगीते सादर केली! माजी सैनिक व नव युवा शक्ती संस्थेचे मार्गदर्शक श्री. मंगेश धिमते यांनी “सैन्य दलात भरती होण्यासाठी आवश्यक निकष व त्यासाठी लागणाऱ्या आरोग्यदायी सवयी” याविषयी पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनद्वारे सुंदर मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथम तीन स्पर्धकांना मेडल प्रमाणपत्र व इतर सर्व सहभागीना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
याप्रसंगी स्वामी विवेकानंद संस्थेचे उपाध्यक्ष तथा गंधार संगीत विद्यालय वासिंदचे संचालक श्री अनंत तरणे सर , श्री आकाश म्हात्रे, श्री शैलेश तरणे, संतोषी माता बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुनीता पाटील, सत्य साई समितीचे अध्यक्ष श्री बुधाभाऊ बरतड,माजी सरपंच श्री अंकुश बरतड, पोलिस पाटील श्री
मछिद्र मराडे यांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली.



