नांदगाव तालुक्याचे माजी आमदार संजय पवार यांचा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
नांदगाव,( प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल ,- नांदगाव तालुक्याचे माजी आमदार संजय पवार यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत येवला येथे हातामध्ये घड्याळ बांधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
माजी आमदार संजय पवार हे 2004 साली शिवसेनेच्या तिकिटावर ते आमदार म्हणून निवडून आले होते. तर 2009 साली ते पंकज भुजबळ यांच्या कडून त्यांना पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. ते सध्या भाजपात होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीत एवढ्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान संजय पवार यांच्या प्रवेशाने आणि स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती वाढण्यास गती मिळणार आहे गती मिळणार आहे.
नांदगाव तालुक्याचे माजी आमदार संजय पवार यांनी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये ्रवेश केला येवला मतदार संघाच्या दौर्यावर आलेल्या छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला.
माजी आमदार संजय पवार हे 2004 ते 2009 या कालावधीत शिवसेनेचे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. मध्यंतरीच्या काळात त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर पुन्हा शिवसेना राष्ट्रवादी व भाजपा असा त्यांचा प्रवास होता. गेल्या दोन वर्षात दोन तीन वर्षापासून ते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये सक्रिय होते.
आज 16 डिसेंबर 2022 रोजी माजी आमदार संजय पवार यांनी छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला येथील संपर्क कार्यालयात अधिकृत रित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश केल्याने या प्रवेशाची महत्त्व प्राप्त झाले असून पवार यांच्या प्रवेशाने नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी बळकट होणार असल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
नांदगाव तालुक्याचे माजी आमदार आदरणीय संजय पवार यांनी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री देशाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला यावेळी माजी आमदार पंकज भाऊ भुजबळ, नांदगाव तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, बाळ काका कलंत्री, तसेच नांदगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा