महाराष्ट्र
कोकणातील पूरग्रस्तांना जळगावाजिल्ह्यातून राष्ट्रवादी कांग्रेसची मदत
कोकणात अतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना जळगावातून अन्नधान्य, कपडे आणि जीवनाअवश्यक वस्तूंची मदत देण्यात आली आहे. ..
निलेश पाटील @ झूम मराठी न्यूज मीडिया
जळगाव – कोकणातील अतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना जळगावातून थेट युवक राष्ट्रवादी कांग्रेसच्या वतीने जीवनावश्यकवस्तू व अन्नधान्य, कपड्याची मदत देण्यात आली. कार्यकर्तेसह कोकणाकडे ट्रक रवाना झाल्या होत्या.
राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमांतर्गत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, जळगावच्या वतीने नुकतेच कोकण, कोल्हापूर, भागात झालेल्या अतिवृष्टी, महापूर, दरडकोसळण्याच्या घटनेमुळे दानशूर व्यक्तींच्या सुहृदय सहकार्यातून कोकणात “दरडग्रस्त” रायगड जिल्ह्यातील “महाड” तालुक्यातील दुर्गम, वाड्यावस्त्यांमध्ये “जीवनाशयक” वस्तूंचे वाटप. राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या टीम ने केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पाचोरा-भडगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या आदेशाने व गटनेते संजय नाना वाघ, तालुका अध्यक्ष विकास पाटील सर, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन दादा तावडे, यांच्या मार्गदर्शनाने. व राष्ट्रवादी युवक, जिल्हा संघटक उमेशदादा एरंडे, युवक चे जिल्हाउपाध्यक्ष पंकज गढरी, शहराध्यक्ष सुदर्शन सोनवणे, यांच्या नेतृत्वाखाली गौरव शिरसाट, ऋषिकेश पाटील, शुभम पाटील, हेमंत पाटील, शिवम देसले, आदेश पाटील, शुभम प्रवीण पाटील तसेच ही सर्व मदत अतिदुर्गम भागात पोहचती करण्यासाठी “महाड” तालुक्यातील स्थानिक कार्यकर्त्यांनी व राष्ट्रवादी च्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले त्यात हिरकनिवाडी चे तानाजी औकीरकर, महाड तालुका राष्ट्रवादी चे तालुकाउपाध्यक्ष मा.धीरजदादा पाटील, खासदार सुनील तटकरे साहेबांचे स्विय सहाय्याक मा. उमेशजी लोखंडे, शिवाजी औकीरकर, हिरकनिवाडी चे उपसरपंच गणेश औकीरकर, माजी सरपंच लहू सावंत, संभाजी औकीरकर, यांच्या सहकार्याने तालुका महाड जि.रायगड येथील खालील दिलेल्या दरडग्रस्थ व पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन जीवनावश्यक वस्तूंची वाटप केली… यावेळी पाचोरा येथून गेलेल्या राष्ट्रवादी युवक च्या टीम ने क्रीडा राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.अदितीताई तटकरे यांची भेट घेतली व पूरग्रस्त व दरडस्तांनासाठी केलेल्या कामाची माहिती दिली त्यावेळी पालकमंत्री मा.अदितीताई तटकरे यांनी पाचोरा राष्ट्रवादी युवक टीम च्या कामाचे कौतुक केले.

टकमकी वाडी 16 कुटुंब, रायगडवाडी 52 कुटुंब, कोळी आव्हाड 14 कुटुंब, शिंदे आव्हाड 5 कुटुंब, हिरकणीवाडी 140 कुटुंब,
परळीवाडी स्थलांतरित 12 कुटुंब, कपडे, साड्या, चप्पल, ब्लेंकेट्स, पाणी बॉटल, गहू, पीठ, तांदूळ.
पोटलेवाडी 24 कुटुंब, कपडे, साड्या, चप्पल, ब्लेंकेट्स, पाणी बॉटल, गहू, पीठ, तांदूळ, ज्वारी.
खडकी — 11 कुटुंब, नेवालीवाडी — 38 कुटुंब, रायगड किल्यावर राहणारे — 27 कुटुंब, किल्ल्याचे SIS Security Guards 17 कुटुंब. वरील प्रमाणे रोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंनी भरलेली प्रती कुटुंब एक किट देण्यात आली असे राष्ट्रवादी युवक चे जिल्हाउपाध्यक्ष पंकज गढरी यांनी झूम मराठीशी बोलताना माहिती दिली





