ब्रेकिंग

पाचोऱ्यात आज मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत आज मराठी राज्य पत्रकार आयोजित कार्यक्रमात पत्रकारांना मिळणार विमा संरक्षण.

संपूर्ण महाराष्ट्रात विविध समाजाभिमुख कार्यक्रम घेत नेहमीच संघटनेच्या पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी एकमेव नावलौकिक कौतुकास्पद कामगिरी करत राहणारी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना असून मुंबई शाखेच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा पत्रकार संघटनेच्या वतीने सालाबादप्रमाणे या वर्षीही आज रविवार रोजी पाचोरा येथील शक्ती धाम भडगाव रोड येथे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. वसंतराव मुंडे, राज्य संघटक मा. श्री. संजयजी भोकरे, प्रदेश सरचिटणीस मा. श्री. विश्वासराव आरोटे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष मा. श्री. प्रवीण सपकाळे, यांच्यासह जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री मा. श्री. गिरीश भाऊ महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेतील पत्रकारांना एक वर्षाचा विमा सोबतच छत्री, रेनकोटचे मोफत वाटप करण्यात येणार असून याच कार्यक्रमात ज्या व्यक्ती समाजासाठी सतत झटून समाजाभिमुख कामे करतात अशा समाजातील विशेष व्यक्तींना मान्यवरांचा हस्ते सत्कार करुन गौरविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला संघटनेच्या सर्व पत्रकारांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन जळगाव जिल्हा सचिव मा. श्री. अनिल आबा येवले, खान्देश विभागीय अध्यक्ष मा. श्री. किशोर रायसाकडा, खान्देश उपाध्यक्ष मा. श्री. प्रमोद सोनवणे, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मा. श्री. नगराज पाटील, यांनी केले आहे. (तसेच जे पत्रकार आजपर्यंत संघटनेचे सदस्य झालेले नाहीत अश्या पत्रकार बांधवांना संघटनेचे सदस्य व्हावयाचे असल्यास त्यांनी प्रेसचे आयकार्ड म्हणजे (ओळखपत्र), आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सोबत आणावेत म्हणजे आपल्याला संघटनेचे सदस्यत्व करुन घेता येईल असे सुचित केले आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे