गुन्हेगारीमहाराष्ट्र

संतती सुखाचे निमित्त करून नाशिकला बाबाकडे महिला गेली , मात्र प्लॅन ‘ वेगळाच ‘ होता

नाशिक | मूलबाळ होत नाही असे भासवून एक महिला पतीसह गंगापूर रोडवरील एका भोंदू बाबा कडे गेली असता त्याने महिलेकडे 50 हजार रुपयांची मागणी करत पूजेमध्ये बसण्यास सांगून हातातील अंगठी तपासण्याच्या बहाण्याने अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मधून उघडकीस आला आहे.

अंनिसने दिलेल्या तक्रारीवरून, गंगापूर पोलिसांनी संशयित भोंदू बाबाला नाशिकच्या जेहान सर्कल परिसरातील एका फ्लॅटमधून मंगळवारी ताब्यात घेतले आहे. शहरातील भर लोकवस्तीत आणि आणि उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार उघडकीस आल्यामुळे भोंदू बाबांचे प्यावं केवळ खेड्या पर्यंतच मर्यादित नाही तर शहरात देखील पसरलेले आहे हे उघड झाले आहे . ‘ फी नाही बक्षीस घेणार ‘ अशा स्वरूपाच्या आकर्षक जाहिराती देऊन हे बाबा लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आणि एकदा जाळ्यात अडकले कि मग त्यानंतर त्यांचे वेगवेगळ्या मार्गाने शोषण करतात .

गंगापूर रोडसारख्या उच्चभ्रु भागात देखील कथित ज्योतिषी म्हणून घेणाऱ्या अशाच एका भोंदू बाबाचा अंनिसने पर्दाफाश केला. गंगापूर पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर एका इमारतीमध्ये संशयित गणेश महाराज याचे फ्लॅटमध्ये असले कारणाने सुरू होते मात्र पोलीस देखील त्याच्या या कारनाम्यापासून अनभिज्ञ होते.

अंनिसने दिलेल्या माहितीनुसार, ‘ भोंदूबाबाने 50 हजार रुपयांची मागणी एका पूजेसाठी केली आणि संतती सुख मिळवण्यासाठी अंधश्रद्धेतून दैवी तोडगा या महिलेला सांगितला मात्र याच दरम्यान महिलेसोबत गैरवर्तन करत वृत्त करण्याचा देखील त्याने प्रयत्न केला.त्यानंतर याचे पुरावे घेऊन आम्ही गंगापूर पोलीस ठाण्यात पोहोचलो ,’ असे डॉक्टर ठकसेन गोराणे राज्य सरचिटणीस अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने सांगण्यात आले आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे