पाचोरा तालुक्यात बाप आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणारा संतापजनक प्रकार…
पाचोरा (प्रतिनिधी) बाप आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणारा संतापजनक प्रकार जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील एका गावात घडला आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच जन्मदात्या पित्याने अश्लील चाळे केल्याचं उघड झालंय. स्वतःच्या मुलीशी दुष्कृत्य करणाऱ्या नराधम पित्याला पोलिसांनी अटक केली. अल्पवयीन मुलीवर तिचाच बाप अनेक महिन्यांपासून सातत्याने अत्याचार करत होता.
सविस्तर माहिती पाचोरा तालुक्यातील एक गावात पिडीत मुलगी ही तिची आई व वडीलांसह वास्तव्याला आहे. आई मोलमजूरी व बकऱ्या चारण्याचे काम करून उदरनिर्वाह करतात. पिडीत मुलगी ही १५ वर्षाची असल्याने ती देखील घरकामात हातभार लावते. २०१९ मध्ये अल्पवयीन मुलगी १२ वर्षाची असतांना नराधम बाप हा घरी कुणीही नसतांना मोबाईलवर कपडे काढलेले अश्लिल व्हिडीओ दाखवत होता. हा प्रक्रार किळसवाना प्रकार असला तरी बाप असल्यामळे मलीने काहीही न बोलता सर्व सहन केले. हा प्रकार आजपर्यंत सुरूच होता. दरम्यान, मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी सकाळी पिडीत मुलीची आई ही बकऱ्या चारण्यासाठी बाहेर गेली. त्यामुळे मुलगी घरी एकटीच होती. दुपारी बकऱ्या चारून तिची आई घरी आल्यावर पिडीत मुलगी घराच्या कोपऱ्यात बसून रडत होती. ती रडत असल्याचे आईला समजल्यानंतर तिला रडण्याचे कारण विचारले. तिने आपल्यावर घडलेला सर्व प्रकार आईसमोर कथन केला. मुलीसोबत घडलेला प्रसंग ऐकल्यावर आईच्या पायाखालची वाळू सरकली. पिडीत मुलीसह तिच्या आईने थेट पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशीरा पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नराधम बापाला पोलीसांनी अटक केली आहे. पोलीस उपअधिक्षक भरत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पाचोरा तालुका पोलीस निरीक्षक किसनराव नजन हे करीत आहेत.




