गुन्हेगारीब्रेकिंगसखी

एका दलित महिलेवर अत्याचार प्रकरणी न्याय कधी? आरोपींना करा अटक!


छत्रपती संभाजी नगर येथील एका दलित महिलेला न्याय मिळण्यासाठी, त्वरित आरोपींना अटक व्हावी यासाठी ग्रामीण पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आयुक्त यांनी एलसीबीच्या ताब्यात केस देऊन लवकर सदर आरोपीस अटक करण्याचे आश्वासन दिले.

सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर येथे तुमच्या जमिनीचा व्यवहार करुन देतो सर्व कागदपत्र घेऊन या असे सांगून 29 जानेवारी 2024 च्या दिवशी एका दलित 25 वर्षीय महिलेचा विनयभंग करून मारपीट व जातीवाचक शिविगाळ केल्याने पीडित महिला ने दोन आरोपी 1) गणेश बाळू निघुट 2) कैलास भगत दोघे राहणार चिकटगाव तालुका वैजापूर च्या विरुद्ध 30 जानेवारी 2024 रोजी वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीस ठाण्यात आरोपी गणेश निघुट व आरोपी कैलास भगत दोघेही राहणार चिकटगावच्या विरुद्ध भादवि कलम 376,323,504,506,34, व अॅट्रॉसिटी 3 (1) (w) (i) नुसार गुन्हा दाखल केला गेला.

त्यातील आरोपी गणेश बाळू निघुट फरार व कैलास भगतला कोर्टाकडून तात्पुरता जामीन मिळाली आहे. स्थानिक पोलिसांनी चार्जशीट कोर्टात दाखल केली आहे व पीडित महिलाने पोलीस महिला कर्मचारीवर करण्याचा व मारहाण कर्मचारीवर प्रतांडित करण्याचा व मारहाण करण्याचा आरोप लावला याची तक्रार 13 मार्च 2024 ला पोलीस आयुक्त सिटी व ग्रामीण कार्यालयाला देण्यात आले होते. आज या घटनेस अडीच महिने होऊन देखील पीडित महिलेला न्याय मिळालेला नाही. आरोपी अजून देखील फरार आहे. यामुळे पीडित महिलाने श्रीमती राजश्री चौधरी सबला उत्कर्ष वृत्तपत्र दिल्लीच्या मुख्य संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई च्या संपर्क प्रमुख दिल्ली यांना सर्व सत्य घटना सांगितल्याने राजश्री चौधरी यांनी सर्व माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना फोन ने कळवली तर त्यांनी पिडीत महिला च्या मागे खंबीरपणे पाठिंबा दाखवून सामाजिक कार्यकर्ता काजल केदारे यांना पीडित महिलांच्या अत्याचाराची सहनिशा राजश्री चौधरी बरोबर करण्यास सांगीतले. तेव्हा काजल केदारे व राजश्री चौधरी दि. 15 एप्रिल रोजी पोलीस स्टेशन शिऊर व वैजापूर आयुक्त कार्यालय गेले असता त्यांना उडवा उडीचे उत्तर मिळाल्यामुळे आज दि.18 एप्रिल च्या दिवशी ग्रामीण पोलीस आयुक्त संभाजीनगर यांना राजश्री चौधरी सबला उत्कर्ष वृत्तपत्र संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संपर्कप्रमुख दिल्ली व पीडित महिला व राहुल परदेशी सबला उत्कर्ष पीडित महिला व राहुल परदेशी सबला उत्कर्ष वृत्तपत्र रिपोर्टर (औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर) यांनी मिळून आज दिनांक 18 एप्रिल ला निवेदन देऊन आरोपी गणेश बाबू निघुट व कैलास भगतला लवकरात लवकर गिरफ्तार अटक करण्याची विनंती केली. पोलीस आयुक्त यांनी फोनवरून आपल्या टीमशी संभाषण करुन या केस बद्दल थोडी माहिती दिली व राजश्री चौधरी व पीडित महिलाला आश्वासन दिले की ही केस आता पोलीस स्टेशनला न जाता छत्रपती संभाजी नगरच्या एलसीबी कडे सोपवण्यात येत आहे व लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे ही आश्वासन दिले असून त्यावर आता पुढे काय कारवाई होते ते महत्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे