पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्कारासाठी धुळ्यात जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
राज्यात महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना गौरवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्यात यावा यासाठी धूळे जिल्हाधिकारी गोयल यांना धनगर समाज संघर्ष समिती मार्फत निवेदन देण्यात आला.
मागील वर्षाप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्यात येतो ज्या ग्रामपंचायती व शासकीय कार्यालय सदर कार्यक्रम करणार नाहीत किंवा हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अश्या अश्याचे निवेदन देण्यात आले.
बालविवाह प्रतिबंध, हुंडा निर्मूलन, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता, मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार यांसारख्या क्षेत्रात काम केलेल्या महिलांना या पुरस्कार देण्यात येतो.
धूळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सदर विषयावर 25 ते 30 मिनिटे वेळ देऊन सखोल चर्चा केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्व विद्यार्थ्यांना सर्व लोकांना माहिती व्हावी यासाठी संघटनेने सुद्धा पुढाकार घ्यावा असे सांगितले, सदर पुरस्कार सर्व ग्रामपंचायतीत वितरित केला जाईल असे सांगितले. सदर निर्णयचा महाराष्ट्रातील २८ हजार ग्रामपंच्यतीतील ५६ हजार महिलांचा सन्मान होणार आहे, सदर चर्चेत पंडित अण्णा मदने, विठ्ठल भाऊ मारणर प्रदेश उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर परदेशी प्रदेश सचिव, शितलताई चिंचोरे महिला प्रदेशाध्यक्ष, प्राध्यापक विजय पाटील युवा प्रदेश उपाध्यक्ष, संदीप पांढरे उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ, सोपान पाटील पंचायत समिती सदस्य, विजय भाऊ वाघ, विजय शिंदे, जिभाऊ पवार, विजय भगवान वाघ, दिनेश मासुळे, रवींद्र बागले, गोपाळ बनगर, सागर नरोटे इ. समाज बांधवांनी सहभाग घेतला.



