पाचोऱ्यातील कला शिक्षकाच्या हातात आहे कला; पोट्रेट पेंटिंगने साकारले सावित्रीमाई…
- दिलीप जय परदेशी
शिक्षक आणि शाळा आठवलं की समोर येतो तो वर्गातील काळा फळा. या काळ्या फळ्यावर अंक आणि अक्षरांशिवाय क्वचितच दुसरे काही नजरेत पडते. मात्र श्रीसंत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय पाचोरा येथील कलाशिक्षक ए.के महाले यांनी काढलेले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची पोट्रेट.. पेंटिंग काढून अनेकांचे लक्षवेधत आहे.
8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनानिमित्त स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयातील कला शिक्षक ए.के महाले यांनी सावित्रीबाई फुले यांची पोट्रेट पेंटिंग अनेकांचे लक्ष वेधत आहे, हे पोट्रेट चित्र रेखाटण्यासाठी त्यांना चार तासाचा अवधी लागला, मेहनत आणि कल्पकतेच्या सहाय्याने जागतिक महिला दिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांची आकर्षक रंगसंगतीत रेखाटलेली पोट्रेट चित्र शिक्षकांच्या वर्तुळात चर्चेची ठरली आहे. संस्थेचे आधारस्तंभ सन्माननीय प्रदीप एम पांडे बडेसर यांनी कलाशिक्षक ए.के. महाले यांचे भरभरून कौतुक केले.


