आपल खान्देश

जळगावच्या महासंस्कृति महोत्सवात पाचोऱ्याच्या शाहिर योगराज सोनवणे यांचे दमदार वहिगायन…


  • दिलीप जय परदेशी

जळगाव सास्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालय जळगाव प्रशासन आयोजित 5 दिवसीय महासंस्कृती मोहत्सव मुक्ताई सरस या मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे लुप्त होत असलेल्या लोककला व कलावंत यांना प्राधान्य व व्यासपीठ मिळावे या साठी या महोत्सवा चे आयोजन करण्यात आले होते.

महासंस्कृति महोत्सवात गोंधळ पोवाडा व वहिगायना या कलेच सादरी करण होते त्यात पिंपळगांव ता.भडगांव येथील शाहिर परशुराम सूर्यवंशी, भाऊसाहेब सूर्यवंशी यानी गोंधळ व लोकगीत सादर केले तसेच पाचोरा शहरातील जय माता पंचरंगी वही मंडळ कृष्णापुरी शाहिर योगराज सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित वही गायन केले. त्याच बरोबर काशिनाथ शंकर सोनवणे यांनी कानबाईची वही सादर केली त्यांच्या सोबत नींबा अहिरे, शशिकांत सोनवणे, शंकर आव्हारे, गोरखसिंग राजपूत, गजानन अहिरे व पोहरी चे राजु वाघ रघुनात माताडे, रमेश मोरे यांनी खुप छान अस वहिगायन सादर केले त्या प्रसंगी कलावंत अभ्यासक बाबाजी कोरडे यांच्या हस्ते सत्कार हि करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे