आपल खान्देशमहाराष्ट्र

धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिवपदी ज्ञानेश्वर परदेशी यांची निवड..

राज्यात धनगर आरक्षण मागणी साठी मोर्चा व आंदोलन करणाऱ्या धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिवपदी ज्ञानेश्वर परदेशी यांची निवड माजी खासदार विकास महात्मे यांनी केली असून तेच योग्य न्याय देणार असल्याची भावना व्यक्त करून त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. ज्ञानेश्वर परदेशी यांचे सामाजिक योगदान वाखान्या जोगे असून ते संधीचे सोनं करतील.

महाराष्ट्र राज्यात धनगर आरक्षण मागणी साठी मोर्चा व आंदोलन उभे करणारे माजी खासदार विकास महात्मे यांचे मोठे योगदान राहिले आहे त्यानी धनगर समाज संघर्ष समिती स्थापन करून धनगर समाजावरील अन्याय विरोधात आवाज उठवून प्रशासनास जागे करून न्याय देण्याचा वेळोवेळी काम राज्यभर या संघटनेच्यावतीने करण्यात येतो ही संघटना राज्यभर पसरली असून प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकारी कार्यरत आहेत.

मुबंईतील गरीब धनगरबांधवासाठी रुग्णवाहीकेचे लोकार्पण

______________________________________

ज्ञानेश्वर परदेशी हे मूळचे धुळे जिल्ह्यातील कुसुम्बा गावातील धनगर समाजातील लढवैय्ये व्यक्तिमत्व ते सध्या बदलापूर येथे वास्तव्यास असतात, त्यांनी मुंबई-ठाणे तालुक्यातील धनगर समाज बांधवाची मोट बांधून त्यांनी कार्यकर्ते जमविले व वेळोवेळी धनगर अनुसूचित आरक्षण अंमलबजावणी ते आंदोलनात आपली भूमिका मांडण्यात दिसत, समाजात धनगर बांधवाना जागरूक करणे व समाजात समाजकार्य करण्यात नेहमीच अग्रेसर राहिलेत समाजाच्या प्रत्येक मोर्च्यात सहभागी होताना दिसतात, ठाणे जिल्ह्यात ते शिक्षकांच्या हक्कासाठी नेहमी बोलतांना दिसतात, मुंबईतील धनगर समाज बाधवांसाठी मोफत रुग्णवाहीका लोक वर्गणीतून उभी केली, धनगर समाज संघर्ष समिती स्थापन झाल्यापासून माजी खासदार डॉ विकास महात्मे यांच्या खांद्याला खांदा लावून धनगर समाजासाठी काम करीत आहेत.

माजी खासदार विकास महात्मे यांनी माझ्यावर सचिव पदाची जबाबदारी टाकल्याने मी न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करील व धनगर समाजासाठी या संघटना मधून लढा देत राहील असे मत ज्ञानेश्वर परदेशी यांनी व्यक्त केले.

 


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे