लोहारा येथील पंडित विद्यालयाच्यावतीने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी कॉर्नर सभा घेत दिली माहिती..
लोहारा (झूम मराठी वृत्त) दहावीच्या विद्यार्थीच्या पालकांसाठी धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव सोसायटी द्वारा संचालित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथील विद्यालयातर्फे कॉर्नर सभा घेऊन अनोखा नवीन उपक्रम राबविण्यात आला.
लोहारा येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव सोसायटीच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लोहारा गावात ठीक ठिकाणी जसे चौधरी गल्ली, संत जगनाडे महाराज चौक, शिवाजीनगर, तपेश्वर नगर या ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेण्यात आल्या या सभेचे कॉर्नर सभेचे प्रास्ताविक वाय पी वानखेडे सर यांनी केले व या सभेचा उद्देश शाळेतील शिक्षकांनी पार पाडलेल्या जबाबदाऱ्या याविषयीची माहिती विद्यार्थी व पालकांना करून दिली आर सी जाधव सर, आर के खोडपे सर, यांनी आपल्या मनोगतातून पालकांनी परीक्षा काळात मुलाकडे कशा पद्धतीने लक्ष द्यावे व कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती दिली, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी चिंचोले सर यांनी विद्यार्थ्यांनीं नघाबरता परीक्षेला निर्भीडपणे कशा पद्धतीने सामोरे जावे तसेच जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून कॉफी मुक्त परीक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्याविषयीची माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यात आली या सभेसाठी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका यु डी शेळके मॅडम पर्यवेक्षक पी एम सुर्वे सर विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या सभेचे आभार व्ही बी इंगळे सर यांनी मानले.



