आपल खान्देश
पोलीस बॉईज असोसिएशन उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी पाचोरा शहरातील नदीम शेख यांची निवड
संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी केली नियुक्ती..
पाचोरा शहरातील कर्तव्यदक्ष नागरिक म्हणुन ओळख असलेल्या पोलीस बॉईज नदीम शकील शेख यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नदीम शेख यांनी या अगोदर पोलीस बॉईज असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्ष पद तसेच पाचोरा तालुका अध्यक्ष पद भूषविले होते त्यामुळे पोलीसांसाठी आजवर त्यांनी केलेली कामे पाहता संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी नदीम शेख यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. नदीम शेख यांच्या निवडीबद्दल जळगाव, नाशिक, मालेगाव, धुळे आदी जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.




