आपल खान्देश

पाचोरा शहरातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व मुकुंद (अण्णा) बिल्दिकर यांच्या शोकसभेत, सर्व पक्षीय मित्रपरिवारांनी वाहिली श्रद्धांजली..

  • दिलीप जय परदेशी

पाचोरा शहरातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व मुकुंद (अण्णा) बिल्दिकर नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतीनां उजाळा देण्यासाठी त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व स्नेही, हितचिंतक व मित्र परीवारा कडुन आज सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन बिल्दीकर प्लाझा येथे करण्यात आले होते.

पाचोरा शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तसेच आशीर्वाद बिल्डर्सचे संचालक मुकुंद (अण्णा) बिल्दिकर यांचे दिनांक 30 जानेवारी रोजी मुंबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाल्याने अनेकांना धक्का बसला त्यांच्या स्मृतीनां उजाळा देण्यासाठी सर्व पक्षीय, मित्रपरिवार, पत्रकार बांधव, व्यवसायीक, त्यांच्यावर प्रेमकरणारे हितचिंतकां कडून आज संध्याकाळी बिल्दीकर प्लाझा त्यांच्या निवास्थानी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते शोकसभेत मोठया प्रमाणात हितचिंतक आले होते.

अनेकांनी श्रद्धांजली वाहिली, अनेकांनी दुःख व्यक्त करून त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. मुकुंद (अण्णा) बिल्दिकर एक व्यवसायिक, राजकारणी तथा समाजकारणी होते. आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून त्यांनी गरजूंना मदत केली. बांधकाम व्यवसायात यश संपादन केले, त्याचबरोबर माणसे जोडण्याचेही काम केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात वक्तृत्व आणि कर्तृत्व यांचा सुंदर मिलाफ झालेला होता. सर्वसामान्य कार्यकर्ते, सामान्य माणसांविषयी बांधिलकी, पत्रकारांवरील प्रेम, गरिबांविषयी कळवळा असणारा एक दानशूर माणूस होता. राजकारणात ही त्यांच्याकडे कुठले ही पद नसतांना त्यांच्या नावाचा शहरात मोठा दबदबा होता.

या शोकसभेत चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, पाचोरा तालुक्याचे आमदार किशोरआप्पा पाटील, अमोल शिंदे, सचिन सोमवंशी, गणेश पाटील,  रावसाहेब पाटील, किशोर बारवकर, विनय जकातदार, अतुल संघवी, मधुकर काटे, खलील  देशमुख, नितीन भाऊ तावडे, भागवत महालपुरे, शरद पाटे, प्रकाश पाटील, पदम बापू पाटील,  नाना वाघ, संजय कुमावत, विकास पाटील, अजहर खान, अरुण पाटील, प्रमोद पाटील, मनोज शांताराम पाटील, अस्मिताताई पाटील, अनिल महाजन प्रवीण ब्राह्मणे, संदीप महाजन, सी एन चौधरी अशा अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे