लोहारा | माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रम अंतर्गत निवडणूक कार्यक्रम..
दिलीप राजपूत
माझी शाळा सुंदर शाळा या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे इयत्ता नववीच्या सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी निवडणूक उपक्रम राबवला गेला विद्यालयाचे मुख्यध्यापक एस टी चिंचोले सर यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक उपक्रम सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही प्रक्रिया कशी राबवली जाते निवडणूक आयुक्त कशाप्रकारे निवडणुका जाहीर करणे तसेच आयोगाची अधिकारी त्यांची कामे विद्यार्थ्यांना समजून सांगितले नंतर विद्यार्थ्यांमधून उमेदवारी अर्ज मागवले व अर्जाची छाननी चिन्ह वाटप निवडणूक तारीख जाहीर करण्यात आली एकूण सहा उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले नंतर मतदान कक्ष बनवण्यात आला केंद्र अध्यक्ष मतदान अधिकारी एक दोन तीन व सहाय्यक कर्मचारी अशा प्रकारे अधिकारी ठरवण्यात आले नंतर विद्यार्थ्यांचे मतदान घेण्यात आले मतदान झाल्यानंतर मतमोजणी करण्यात आली त्यात वृषभ प्रदीप क्षिरसागर या विद्यार्थ्याला सर्वाधिक 24 मते मिळाली तो विजयी झाला विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला या उपक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी चिंचोले पर्यवेक्षक व्ही एम शिरपुरे उपशिक्षक आर आर खोडपे आर जे निकम आर के सुरवाडे आर सी जाधव व बी एन पाटील तसेच पत्रकार बंधू गजानन क्षिरसागर व विद्यालयातील सर्व शिक्षकांचे योगदान लाभले.



